वैभव देशमुख : एक गझल


१. 
या इच्छेहुन त्या इच्छेवर
मन आहे की आहे वानर

हवा तुला शिणगार कशाला
हवी कशाला मधात साखर

रस्ता अडवुन बसला होता
ठिकर्‍या होउन पडला डोंगर

दिसेल का शब्दांचे पाणी
फुटतिल का हे मौनांचे थर...

- वैभव देशमुख

1 comment:

  1. क्या गझल कही है वैभव! वाह! असं बारीक काम मराठीत काय कुठल्याही भाषेत दुर्मिळच आहे. गुजराती अनुवाद तुम्हाला अर्पण...

    या इच्छेहुन त्या इच्छेवर
    मन आहे की आहे वानर
    आ इच्छाथी ते इच्छापर
    मन छे के छे कोई वानर

    हवा तुला शिणगार कशाला
    हवी कशाला मधात साखर
    शाने तुं शणगार करे छे
    जोईए केम आ मधमां साकर

    रस्ता अडवुन बसला होता
    ठिकर्‍या होउन पडला डोंगर
    रस्तो रोकी बेठो'तो ए
    ठीकरां थईने पड्यो छे डुंगर

    दिसेल का शब्दांचे पाणी
    फुटतिल का हे मौनांचे थर...
    देखाशे के शब्दनुं पाणी
    फूटशे के नहि मौनना आ थर...

    ReplyDelete