१.
डोळ्यांमधले वादळ झाली
तुझी आठवण काजळ झाली
तुझी आठवण काजळ झाली
जागत होती रात्र एकटी
प्राजक्ताची बाभळ झाली
प्राजक्ताची बाभळ झाली
सांज केशरी सरता सरता
राधा अलगद सावळ झाली
राधा अलगद सावळ झाली
रीत अशी ही..प्रीत अशी ही
इथे अहिल्या कातळ झाली
इथे अहिल्या कातळ झाली
शब्द कोरडे नव्हते केवळ
माया अवघी पातळ झाली
माया अवघी पातळ झाली
२.
चाहूल तुझी लागत नाही
रात्र पैंजणे घालत नाही
रात्र पैंजणे घालत नाही
अंधार तसा खूप बोलका
एकटे मला वाटत नाही
एकटे मला वाटत नाही
हातात हात घेते क्षणभर
दुसरे काही मागत नाही
दुसरे काही मागत नाही
ओळखते मी तुझा चेहरा
मुखवट्यास या भाळत नाही
मुखवट्यास या भाळत नाही
वळून मागे बघितलेस ना ?
अंतर आता वाढत नाही
अंतर आता वाढत नाही
स्वप्नांचा हा मोरपिसारा
काळजात या मावत नाही
काळजात या मावत नाही
३.
नकोस देऊ हाक अनावर
आले शेवटच्या वळणावर
आले शेवटच्या वळणावर
तोल जायच्या आधी क्षणभर
ताबा ठेवून बघू मनावर
ताबा ठेवून बघू मनावर
भेट आपली लिहीली होती
आयुष्याच्या या पानावर
आयुष्याच्या या पानावर
उत्सव सरतो बघता बघता
मागे उरते आवर सावर
मागे उरते आवर सावर
आसपास तू नसताना ही
शीळ कशी येते कानावर
शीळ कशी येते कानावर
आठवणींचा गजरा माळुन
रात्र थांबली त्या क्षितिजावर
रात्र थांबली त्या क्षितिजावर
४.
वाटेवरच्या निशीगंधाचे बहर टाळते
आजकाल मी तुझे दिव्यांचे शहर टाळते
आजकाल मी तुझे दिव्यांचे शहर टाळते
आवडते पण पहात नाही तुझ्या दिशेने
खरे सांगते मी नजरेचे कहर टाळते
खरे सांगते मी नजरेचे कहर टाळते
दूर लोटते काळजातले वादळ वारे
आठवणींची तरंगणारी लहर टाळते
आठवणींची तरंगणारी लहर टाळते
खरा चेहरा वाचत नाही मी कोणाचा
आपुलकीच्या शब्दांमधले जहर टाळते
आपुलकीच्या शब्दांमधले जहर टाळते
अंधाराला पांघरते या पुन्हा पुन्हा अन्
चांदणवेळी अंगणातले प्रहर टाळते
चांदणवेळी अंगणातले प्रहर टाळते
५.
मी नात्यांना शोधत गेले..
एकांताशी बोलत गेले..
एकांताशी बोलत गेले..
दिला सुखांनी कधी भरवसा ?
दु:खांना मग जोडत गेले..
दु:खांना मग जोडत गेले..
खुशाल गाणी ओठांवरची..
वा-यावरती सोडत गेले..
वा-यावरती सोडत गेले..
पराभवाची पर्वा नव्हती..
डाव मांडुनी मोडत गेले..
डाव मांडुनी मोडत गेले..
नको ऋतुंच्या फसव्या शपथा..
पाश फुलांचे तोडत गेले...
.............................................
डॉ संगीता म्हसकर
पाश फुलांचे तोडत गेले...
.............................................
डॉ संगीता म्हसकर
No comments:
Post a Comment