Showing posts with label राहुल शंकर साळवे. Show all posts
Showing posts with label राहुल शंकर साळवे. Show all posts

राहुल शंकर साळवे : एक गझल


१.
होते घरात तोवर मारून ताव गेले
कंगाल पक्ष आता सोडून साव गेले..

डोळ्यांत साचलेला पाऊस तोच आहे
दुष्काळ  भोगला ते वाहून गाव गेले..

कोणास हाक द्यावी कोणीच आपले ना   
 हृदयात बसविले ते देऊन घाव गेले..

चोरून पाहते ती पाहून लाजते ती
माझ्यात गुंतली ती सांगून भाव गेले..

वाटेल चांगले ते 'राहूल' तू करावे
संतास लोक काही ठेवून नाव गेले....
.............................................
राहुल शंकर साळवे
बुलडाणा
8698000649