मी पुन्हा जखमा जुन्या उसवून जातो टेबलावर!
तू नवा की मी जुना विसरून जातो टेबलावर !
तू नवा की मी जुना विसरून जातो टेबलावर !
रोजची हमखास असते एक चक्कर भावड्यांनो ;
दोस्त आला का जुना पाहून जातो टेबलावर !
दोस्त आला का जुना पाहून जातो टेबलावर !
तोच पंखा, तीच बैठक, तो चहाचा उग्र दर्प ;
तीच चिंगम रोजची चघळून जातो टेबलावर!
तीच चिंगम रोजची चघळून जातो टेबलावर!
एक झुरका जिंदगीभर अंतरंगी कोंडलेला ;
मी धुरातुन कैकदा सांडून जातो टेबलावर !
मी धुरातुन कैकदा सांडून जातो टेबलावर !
ऐकणा-या दोन खुर्च्या सोबती गोंगाट इथला ;
मीच मग माझी गझल गावून जातो टेबलावर!
मीच मग माझी गझल गावून जातो टेबलावर!
फक्त उरल्या आठवांचा वाढतो जेव्हा पसारा ;
दुःख माझे मी मला सांगून जातो टेबलावर !
दुःख माझे मी मला सांगून जातो टेबलावर !
मी परत यादी घरी घेऊन जातो राशनाची ;
शेर एखादा नवा राहून जातो टेबलावर !
शेर एखादा नवा राहून जातो टेबलावर !
२.
जर कधी झाली तुझी श्रद्धा उथळ !
पंचअमृता मधे दारू मिसळ !
पंचअमृता मधे दारू मिसळ !
गाळलेली आसवे गेली कुठे ?
कोणत्या यंत्रात हा निघणार चळ ?
कोणत्या यंत्रात हा निघणार चळ ?
रात्र झाली की कुठे जातो बरे ?
सांग सुर्या रे तुझे लफडे सरळ ?
सांग सुर्या रे तुझे लफडे सरळ ?
द्यायचा कापुस धोका ज्या सुगी ;
बाप घेवुन द्यायचा सदरा 'ढगळ' !
बाप घेवुन द्यायचा सदरा 'ढगळ' !
मी घरी बिन राशनाचा चाललो ;
आजही आहे घरी दंगा अटळ !
आजही आहे घरी दंगा अटळ !
शपथ बापाच्या नशेची ही तुला ;
फक्त गझलेनेच हा पेला विसळ !
फक्त गझलेनेच हा पेला विसळ !
३.
हासलो अन् पाहिले डोळ्यात मी !
वेदनेची जाणली औकात मी !
वेदनेची जाणली औकात मी !
पेग मी भरला उजेडाचा अता ;
सुर्य आहे ठेवला प्याल्यात मी !
सुर्य आहे ठेवला प्याल्यात मी !
श्वास आता भीक मागू लागले ;
कोणत्या आहे बरे तो-यात मी !
कोणत्या आहे बरे तो-यात मी !
शेवटी काडी करावी लागते ;
अन्न थोडे ठेवले दातात मी !
अन्न थोडे ठेवले दातात मी !
कोणत्या राशीत सांगा जन्मलो ?
कर्क सुध्दा मारला रक्तात मी !
कर्क सुध्दा मारला रक्तात मी !
भाकरीचे फक्त डोहाळे म्हणे ;
शांत ही होतो कुठे गर्भात मी ?
शांत ही होतो कुठे गर्भात मी ?
४.
सांग आता कोणता लावू टिळा ?
मज कळेना रंग की गोतावळा !
मज कळेना रंग की गोतावळा !
या धु-याने दोन हिस्से पाडले ;
पाखरांनी वाटला नाही मळा !
पाखरांनी वाटला नाही मळा !
दुःख म्हणजे एक उत्सव माणतो ;
आसवे या पापण्यांचा सोहळा !
आसवे या पापण्यांचा सोहळा !
गालिच्यावर मी तुझ्या चालू कसा ?
टोचतो पायास चपलेचा खिळा !
टोचतो पायास चपलेचा खिळा !
एवढ्या गर्दीतुनी मज शोधतो ;
संकटा माझा किती रे कळवळा !
संकटा माझा किती रे कळवळा !
जानवे काढून बघं रे विठ्ठला ;
तू पुन्हा पहिल्यापरी होशिल निळा !
तू पुन्हा पहिल्यापरी होशिल निळा !
५.
प्रश्न रानोमाळ झाले !
रात्र तान्हे बाळ झाले !
रात्र तान्हे बाळ झाले !
वाहत्या पाण्यात गाथा ;
दगड गोटे टाळ झाले !
दगड गोटे टाळ झाले !
केवढी निर्लज्ज मैफल;
पैंजणांचे चाळ झाले !
पैंजणांचे चाळ झाले !
बाटली संन्यस्त झाली;
'रम' मधे शेवाळ झाले ?
'रम' मधे शेवाळ झाले ?
मी जरासा फुंकलो अन् ;
मोकळे आभाळ झाले !
मोकळे आभाळ झाले !
.............................................
No comments:
Post a Comment