Showing posts with label अनिल एस पाटील. Show all posts
Showing posts with label अनिल एस पाटील. Show all posts

अनिल एस पाटील : पाच गझला



१.
कोण  वैरी  कोण  येथे  यार आहे .
मतलबाचा  लागला आजार आहे .

स्वाभिमानाला जरा ना मोल येथे ,
हलकटांना भाव आता फार आहे .

गुंफती हे श्वास  मायाजाल  तेव्हा ,
जिंदगीचा  चालतो  व्यापार आहे .

एकटा  घोडा  बघा  लाचार  जेथे ,
गाढवांचा  लागला  बाजार  आहे .

शोधले मी  संत कोठे  गावतो का ,
गावले ना एकही  मज द्वार  आहे .

समर सारे कागदावर जिंकतो मी ,
एवढी या  लेखणीला  धार  आहे .

२. 
माणसाला  मोल नाही  मांडला बाजार आहे
दानवाला भाव  मोठा  देव का लाचार  आहे

दोन  नंबर थोर  झाले एक नंबर  चोर आता
कोण छोटे कोण मोठे लागला आजार आहे

हारलेला बोलला की  लोकशाही  ठार झाली
जिंकलेला शाह भावा मानतो  आभार आहे

गंधवेडे  लोक  आणिक झिंगलेले  रान  सारे
चंदनाशी   खेळणारे साप  येथे   फार  आहे

बातमी हो ऐकली मी जात आता प्रौढ झाली
काल होती बेसहारा  आज ती आधार आहे

जाणतो मी आरशाला झोप काही येत नाही
माणसे  ती  साठलेली पारदाला  भार आहे

---------------------------------------------
अनिल एस. पाटील