१.
जाळे पुढे पसरण्या विसरून कोण गेली,
माशास या उचलण्या विसरून कोण गेली
माशास या उचलण्या विसरून कोण गेली
एका स्मितातुनीही घायाळ मज समजता
उपचार पूर्ण करण्या विसरून कोण गेली
उपचार पूर्ण करण्या विसरून कोण गेली
काहूर स्पंदनांचे ह्रदयात माजवूनी
हृदयासनात बसण्या विसरून कोण गेली
हृदयासनात बसण्या विसरून कोण गेली
नयनात भावसुमने हलकेपणी उमलता
नजरेमधून टिपण्या विसरून कोण गेली
नजरेमधून टिपण्या विसरून कोण गेली
घेऊन मीलनाच्या चंद्रासमोर शपथा
बाहूत मज बिलगण्या विसरून कोण गेली
बाहूत मज बिलगण्या विसरून कोण गेली
२.
नसती सुरेख मोहकशी खळी तुझ्या जर गालावर
नसते बसले मन माझे घिरट्या घालत मग त्यावर
नसते बसले मन माझे घिरट्या घालत मग त्यावर
सहज एकदा पडली माझी त्या आरशावर
प्रतिबिंबाला पाहुन मी गेलो भाळुन माझ्यावर
प्रतिबिंबाला पाहुन मी गेलो भाळुन माझ्यावर
गाढ झोपलो असता मी स्वप्नी सुंदरशा ललना
सगळ्या पसार का होती पण मी जागा झाल्यावर
सगळ्या पसार का होती पण मी जागा झाल्यावर
झाली वाटुन अर्धी ती स्थावरजंगम पाहुनिया
एक वाटणे आईचे काळिज उरले अर्ध्यावर
एक वाटणे आईचे काळिज उरले अर्ध्यावर
बसलो मारत गप्पा मी नावाशीहि निवांत तुझ्या
लिहिले होते नाव तुझे कागदाच्याच तुकड्यावर
लिहिले होते नाव तुझे कागदाच्याच तुकड्यावर
बभ्रा केलाच गावभर उघडपणे पण वाऱ्याने
जरी माळला गुपचुप मी गजरा तुझ्या ग केसावर
जरी माळला गुपचुप मी गजरा तुझ्या ग केसावर
३.
कुठे कशी फिर्याद करू मी झाली हृदयाची चोरी
हिंडत आहे करून चोरी प्रेमिकाच वर शिरजोरी
हिंडत आहे करून चोरी प्रेमिकाच वर शिरजोरी
फसले नाटक तुझे छान ते चोरुन बघण्याचे ग मला
होता नजरानजर आपली का होशी गोरीमोरी
होता नजरानजर आपली का होशी गोरीमोरी
घेण्या झोके मनासारखे प्रयत्न जीवनभर केले
समजायाला उशीर झाला नियती हाती ती दोरी
समजायाला उशीर झाला नियती हाती ती दोरी
असता सोबत तुझी मला ती गिरवत होतो नाव सखे
सुटली अर्ध्यावरती सोबत आहे ती पाटी कोरी
सुटली अर्ध्यावरती सोबत आहे ती पाटी कोरी
दार मनाचे दिसता उघडे लगेच घुसली मनात ती
दात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी
दात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी
.............................................
विजयकुमार देशपांडे, सोलापूर
मो. 9011667127
विजयकुमार देशपांडे, सोलापूर
मो. 9011667127
No comments:
Post a Comment