१.
नको नको ते बोलत असते पडद्यामागे
कुणी कसेही वागत असते पडद्यामागे
कुणी कसेही वागत असते पडद्यामागे
हसताना ती सुंदर दिसते पडद्यावरती
दु:ख स्वत:चे लपवत असते पडद्यामागे
दु:ख स्वत:चे लपवत असते पडद्यामागे
दोरीवरची करून कसरत एक पोरगी
कुटुंब अख्खे जगवत असते पडद्यामागे
कुटुंब अख्खे जगवत असते पडद्यामागे
दु:खामध्ये जेव्हा जेव्हा रडतो आपण
दु:ख मजेने हासत असते पडद्यामागे
दु:ख मजेने हासत असते पडद्यामागे
तू माझा अन् तुझीच मी हे सांगत असते
वेगळीच पण वागत असते पडद्यामागे
वेगळीच पण वागत असते पडद्यामागे
कुणा द्यायचे कसे द्यायचे किती द्यायचे
सगळे नियती ठरवत असते पडद्यामागे
सगळे नियती ठरवत असते पडद्यामागे
२.
जखम हृदयातली भरली तिने कुरवाळल्यानंतर
तिचा होऊन गेलो मी तिच्यावर भाळल्यानंतर
शपथ घेऊन सासूने मला इतकेच सांगावे
सुखी राहील का मुलगी ? सुनेला जाळल्यानंतर
सुखी राहील का मुलगी ? सुनेला जाळल्यानंतर
वयाने वृद्ध होण्याच्या जरा आधी मला जाळा
कसा राहीन शिल्लक मी व्यथांनी जाळल्यानंतर
कसा राहीन शिल्लक मी व्यथांनी जाळल्यानंतर
न लिहिलेल्या तिच्या सगळ्या मला दिसल्या जुन्या जखमा
वहीच्या शुभ्र पानांना नव्याने चाळल्यानंतर
वहीच्या शुभ्र पानांना नव्याने चाळल्यानंतर
तृणाच्या फक्त काडीगत असावी जिंदगी हलकी
गवत होते जसे हलके उन्हाने वाळल्यानंतर
गवत होते जसे हलके उन्हाने वाळल्यानंतर
जखम बांधून बोटाची मला इतकेच म्हटली ती
असे होणार का नाही ? मला तू टाळल्यानंतर
असे होणार का नाही ? मला तू टाळल्यानंतर
३.
स्पर्श तिचा जर जाहलाच तर जीव तिथे व्हावा गोळा
जिच्याबरोबर ओळख व्हावी तिचे असावे वय सोळा
लळा एवढा स्वप्नांनाही पुन्हा लागला तुझा व्यथे
की, जागा मी झाल्यानंतर तुझाच घेतो धांडोळा
की, जागा मी झाल्यानंतर तुझाच घेतो धांडोळा
सुकून गेल्या फुलासारखे जीवन माझे झाले बघ,
प्रमाण असते आयुष्या, होण्यालाही चोळामोळा
प्रमाण असते आयुष्या, होण्यालाही चोळामोळा
उभा जन्म हा भरण्यामध्ये जातो पोटाची खळगी
जसा उन्हाने वाळावा अन् उडून जावा पाचोळा,
जसा उन्हाने वाळावा अन् उडून जावा पाचोळा,
जिवंत असता कुणीच त्याला चुकूनही भेटत नाही
अन् मेल्याचे कळल्यानंतर उगाच होते जग गोळा
अन् मेल्याचे कळल्यानंतर उगाच होते जग गोळा
शब्दांच्या मागे लपलेले नाव तिचे जर नव्हते तर
व्यथा ऐकल्यानंतर ओला तिचाच झाला का डोळा ?
व्यथा ऐकल्यानंतर ओला तिचाच झाला का डोळा ?
.............................................
महेश मोरे
Mahesh More Sir aflatun superbbbbbb ...Sugi
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद .........
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद .........
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDeleteSundar
ReplyDeleteNice....
ReplyDeleteGood
DeleteNice more sir
ReplyDelete1नंबर सर. फारच छान.
ReplyDeleteCongratulations Sir
ReplyDelete