मुहाजिरनामा : एक गझल : एक पुस्तक :श्यामनाथ पारसकर


 मुनव्वर राना या भावकवीची एक रवानी गझल. शीर्षक आहे-मुहाजिरनामा. तब्बल पाचशे अठ्ठावन्न शेरांचा समावेश असणारी. ग्रंथरूपात प्रसिद्ध.

‘मुहाजिर है मगर हम एक दुनिया छोड आए है
तुम्हारे पास जितना है हम उतना छोड आए है’

ह्या प्रथम शेराने प्रारंभ होणार्‍या गझलेचा प्रवास  ‘रेआया थे तो फिर हाकिम का कहना क्यो नही माना, अगर हम शाह थे तो क्यो रेआया छोड आए है’ ह्या पाचशे अठ्ठावन्नाव्या शेराने थांबतो.

देशफाळणीच्या  आगीने  होरपळलेल्या अंतर्मनावरील फोडांची  ठसठस  म्हणजे  ही गझल. धारावाही.जदीद.तरक्कीपसंद गझल.

कई जख्मोकी पपडीमे नमी मौजूद है अबतक
कई यादो की तुरपाई को उधडा छोड आए है

ग़ज़ल मे हमने हिजरत के बहुत से दुख समेटे है
समन्दर कैद था जिसमे वो कुँवा छोड आए है

ह्या गजलेचे वृत्त आहे-बहर-ए-हजज मुसम्मन सालिम. अक्षरगण आहे-पद आहे वा रूक्न आहे ‘मुफाईलुन’. हा अक्षरगण गजलेच्या ओळीमधे दोनदा आवृत्त होत असेल जसे-

कभी इकरार की बाते । कभी इनकार की बाते 
चले आओ मिरे दिल मे । नही कटती है अब राते

तर हे द्वयावर्तनी वृत्त आहे बहर-ए-हजज. मुरब्ब: सालिम. त्रयावर्तनी असते तर बहर-ए-हजज मुसद्दस सालिम. मुहाजिरनामा गझलेत अक्षरगण प्रत्येक ओळीत चारदा आवृत्त होत असल्यामुळे -बहर-ए-हजज मुसम्मन सालिम.
उदा.
हुई मुद्दत कि ‘गालिब’ मर गया पर याद आता है
वो इक हर बात पर कहना कि यों होता तो क्या होता
........
न झटको जुल्फसे पानी ये मोती फूट जायेंगे
तुम्हारा कुछ न बिगडेगा मगर दिल टूट जायेंगे (राजेन्द्र कृष्ण)
.......
मुहाजिरनाम्यात-

उधर का कोई मिल जाए इधर तो हम यही पूछे
हम आँखे छोड आए है कि चष्मा छोड आए है

उतरती धूप आँगनमे घडी का काम करती थी

हर इक मौसम को पढने का तरीका छोड आए है

शराफत थी नजाबत थी मुरव्वत थी मुहब्बत थी

हर इक मौसम को पढने का तरीका छोड आए है

सियासत भी हमारी ताशके पत्तों की सी निकली 

वजीरो-शह तो ले आए है इक्का छोड आए है

अशा तर्‍हेने गझल पुढे पुढे जात राहते. मनाचा तळ ढवळत राहते. कधी सहानुभाव व्यक्त करते  तर  कधी वतन सोडल्याचा पश्चात्ताप. खंत, हळहळ व्यक्त करीत राहते. कधी लाचार दिसते कधी माँयूस दिसते. स्वत:वर कातावतेसुद्धा.

वहाँ की खाक भी मुम्किन है हमसे फासला रक्खे
कि हम आते हुए उसका भरोसा छोड आए है

समन्दर अब वही लहरें हमे आँखे दिखाती है

वो जिन लहरो की खातिर हम किनारा छोड आए है

हिमालय सर उठाए आज तक आवाज देता है

उसे लगता है जैसे साथ उसका छोड आए है

ह्या दीर्घ गझलेची जन्मकथा काहीशी विलक्षणच. शायर मुनव्वर राना आपल्या ‘हम खुद उधडने लगते है तुरपाई की तरह’ ह्या प्रस्तावनापर निवेदनात प्रसंग कथन करतात; तो असा- एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुशायर्‍यात सहभागी होण्यासाठी शायर जातात. ध्रुम्रपानाची हुक्की आल्यामुळे धुम्रपानासाठी बाहेर उठून येतात. तेथे त्यांना एक सद्गृहस्थ भेटतात. गृहस्थ प्रथम स्वत:चा परिचय देतात. नंतर विनंती करतात की, सिंध प्रांतातील हैद्राबादेस आम्ही मुशायरा आयोजित केलेला आहे. आपणास निमंत्रण देत आहोत. आपण अवश्य यावे. सहभागी व्हावे. शायर रानांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मुशायर्‍यात आपण सहभागी होवू शकणार नाही असे नम्रपणे नमूद केले.

परंतु सद्गृहस्थ मात्र आग्रह करीत राहिले. शायर राना नाकारत राहिले. शेवटी तर त्या गृहस्थांनी... रानांच्या शब्दात सांगायचे तर ‘कमजोर बात’ केली. 'हलकी बात' केली. गृहस्थ शायरांना म्हणाले की ह्या मुशायर्‍याचा जो नजराना (मानधन) तुम्हाला मिळेल त्यापेक्षा दुप्पट नजराना आम्ही तुम्हास पेश करू. देवू. तोपावेतो राना मंचावर पोहचले होते. लवकरच गझल 'कहन्या'साठी त्यांना पाचारण होणार होते. पण नुकतीच ऐकलेली ‘बहुत हलकी बात’ मनात रूतली. सल वाढत गेला. मंचावर बसल्यापासून तो गझल पेश करण्यास पाचारण होईस्तोवर मनातली खदखद शेरांमधे उतरायला लागली. राना जेव्हा उभे राहिले सहजच त्यांच्या मुखातून ते शेर, ताजा कलाम बाहेर पडायला लागले-

मुहाजिर है मगर हम एक दुनिया छोड आए है
तुम्हारे पास जितना है हम उतना छोड आए है

मुहाजिर कह के दुनिया इसलिए हमको सताती है

कि हम आते हुए कब्रो मे शजरा छोड आए है

...आणि गजल सुरू झाली. पुढे काही शेर सुनावलेत. मुशायरा संपला. पण गजल पुढे आकार घेत राहिली. साडेपाचशे शेरांहुन अधिक शेर सामावलेली ‘मुहाजिरनामा’ ही दीर्घ गझल जन्मास आली. त्याच गझलेचे ग्रंथरूप हा वाणी प्रकाशन-सहारा इंडिया मास कम्युनिकेशनद्वारे प्रकाशित-मुहाजिरनामा. म्हटली तर एक गझल, म्हटला तर एक ग्रंथ.

आमच्या वर्‍हाडातील अकोल्याचे हिन्दी शायर श्री प्रकाश पुरोहित ह्यांची एक दोनशेे पन्नास शेर असणारी गझल पुस्तकरूप घेवून ‘फिर संसदमे हंगामा’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. उल्लेखनीयच आहे. मराठी गझल प्रांतातसुद्धा असे प्रयोग झालेले आढळून येतात. अलिकडेच हेमलता पाटील ह्यांची एक्कावन्न शेरांचा समावेश असणारी दीर्घ गझल वाचावयास मिळाली.

शायर रानांचे पूर्वज रायबरेलीस आलमगीर मस्जीदीत इमामत करायचे. देश विभाजनानंतर ते ‘वतन’ सोडून गेलेत. घरदार, शेतीवाडी, जमीन-जायदाद सारे काही इथेच सोडून गेलेत. खानदान, मित्रस्वजन, शेजारीपाजारी, पशूू-पक्षी, परिसर, नद्या-पर्वत असं दाखवण्याजोगे बरेच काही. त्यापेक्षा जास्त न दिसणारं बरंच काही. मन उघड करूनही दाखवता येणार नाही असंही बरंच काही. अंत:पटलावर कायम कोरल्या गेलेल्या अमिट आठवणी.

पुरानी यादके मौसम बडी तकलीफ देते हैं
सो हम यादों के दरवाजे पे ताला छोड आए हैं

किसी मौसम मे हमको चैन से सोने नही देती

वो रिश्तेदारियाँ जिनको अकेला छोड आए है

नई दुनिया बसा लेने की इक कमजोर चाहत मे

पुराने घर की दहलीजो को सूना छोड आए है

ह्या रिश्तेेदारियाँ तरी किती किती प्रकाराच्या. मूर्त, अमूर्त, प्रकट, अप्रकट हळव्या, रडव्या. काही केवळ उरबडव्या. भावबंध नुसते. काही नाती नसून असणारी. काही नसून निभावता न येऊ शकणारी. केवळ तअल्लुक. परंतु त्यांच सुटणं, तूटणं, विरळ होत जाणं, अवशेषमात्र असणं हे फार फार डाचणारं.

वो जिनसे रिश्ते-दारी तो नही थी हाँ तअल्लुक था
वो लक्ष्मी छोड आए है वो दुर्गा छोड आए है

अकीदतसे कलाई पर जो एक बच्ची ने बांधी थी

वो राखी छोड आए है वो रिश्ता छोड आए है

बुआ कहते थे हम अब्बू उन्हे दीदी समझते थे

उन्होने जो उढाई थी चदरिया छोड आए है

सडक कच्ची थी लेकिन दोस्ती मजबूत होती थी

हम ऐसे गाँव मे रिश्ते का खेमा छोड आए है

जला करती थी रोज ओ-शब जहाँ रिश्तो की किन्दीले

हम ऐसी बस्तियों मे घुप अंधेरा छोड आए है

जमिनीवर विभाजन रेषा ओढली गेली. घरात व अंगणात नव्याने उभारलेल्या भिंतींनी मनं आधी दुभंगली. नंतर घरं. घरं खंगली. मन भंगली. पण घरामधे नांदणारी भिन्न धर्मी, परस्पर विरोधीधर्मी पशू ,पक्षी, प्राण्यांची असली मुहब्बत आजही आठवण करून देते-

हमारे घर मे बिल्ली और तोता साथ रहते थे
मुहब्बत हम तेरा असली नमुना छोड आए है

शायरांच्या मनात आजही अफसोस आहे, मलाल आहे. आणि वाडवडिलांनी का बरं सोडलं वतन हा कायम अनुत्तरित प्रश्नसुद्धा आहे. काय नव्हतं इथे, काय हवं होतं की ज्यासाठी वतनाला रूसवा करून सोडून आलोत. ज्या मातीत पैदा झालो, रूजलो, फुललो, फळांनी लदबदलो त्या मातीतली आपली पाळंमुळं एका झटक्यात उखडून अन्यत्र आपण  का नाही रूजू शकलो?असा विचार न करता नवीन खड्डयात का येवून पडलो?

अलग मजहब यकीनन थे मुहब्बत एक जैसी थी
गले मिलने के दिन आए तो कस्बा छोड आए है

गले मे हाथ डाले घुमते थे मुख्तालिक मजहब

वो काशी छोड आए है वो मथुरा छोड आए है

गले मिलती हुई नदियाँ गले मिलते हुए मजहब

इलाहाबादमे कैसा नजारा छोड आए है

आम्हाला मिळणारं अन्न एक होतं. पोषण एक होतं. वतन एक होतं. सुखदु:खात राहणं एक होतं. बसती एक, आशियाना एक, हवा-पाणी एक, आबो-दाना एक, तालिम-शिक्षण एक. मग गुण्यागोविंदानं राहणं आम्ही का सोडावं? पेच अद्यापही सुटत नाही.

-अलग मजहब के थे लेकिन दुखो मे साथ रहते थे
हम ऐसी दोस्ती का रंग कच्चा छोड आए है

-अगर सचमुच कोई पुछे तो उसको क्या बताएंगे 

कि अपनी मस्जिदो को क्यों अकेला छोड आए है

-वो मन्दिर हो कि मस्जिद हो कि गिरजा हो कि गुरूद्वारा

जहॉ सब साथ रहते थे वो दुनिया छोड आए है

शायर रानांना आठवते आपला मुल्क कसा होता. त्यास ते ‘तहजीबी मुल्क’ म्हणतात. कोणाला सांगायचं, काय सांगायचं, कोण समजून घेईल की आमचा इलाका तहजीबी इलाका होता आणि आहे.

यहॉ किसको बताएँ कौन है जो हमको समझेगा
कि हम सम्भल का तहजीबी इलाका छोड आए है

हिमालयातून उगम पावणार्‍या नद्या

गंगा, जमना व प्रत्येक नदी आवाज देत बोलावते-

हिमालय से निकलती हर नदी आवाज देती है

मियाँ आओ वुजू कर लो ये जुमला छोड आए है

वुजू करने को जब भी बैठते है याद आता है

कि हम उजलत मे जमना का किनारा छोड आए है

तयम्मुम के लिये मिट्टी भल किस मुँह से हम ढुंढे

कि शफ्फाफ गंगा का किनारा छोड आए है

अभी तक गोमती से कोई पुछे तो बताती है

ग़ज़ल सुनते थे जिस बजरे पे बजरा छोड आए है

वतन आपलं होतं. माणसांमधे एकोपा होता. आपुलकीची ओल होती. घरा-घरामधे सलोखा होता. सण-त्योहार वेगळे नव्हते; तुझे-माझे नव्हते तर सगळयांचे होते. सगळे सोबत साजरे व्हायचे. आचार, विचार आणि उच्चारांमधे तफावत नव्हती. सार्वजनिक सण समारंभात व्यक्त होण्याची सार्‍यांना मोकळीक होती. मुभा होती.

सभी त्योंहार मिल-जुलकर मनाते थे वहाँ जब थे
दिवाली छोड आए है दशहरा छोड आए है

दशहरे पे जहाँ हर साल रावन को जलाते थे

उसी टीले पे जलने को कबीला छोड आए है

उसी मे भाई जुम्मन राम का किरदार करते थे

अभी तक याद है जो राम-लीला छोड आए है

तमन्नाएँ जियाद: थी वहाँ आसाइशे कम थी

यहा पर तेल नौ मन है तो राधा छोड आए है

जनम जिसने दिया हमको उसे तो साथ ले आए

मग आते हुए मय्या याशोदा छोड आए है

मिठाई की दुकाने इसलिए अच्छी नही लगती

कि हम मेले मे अपना राम-दाना छोड आए है

तो फिर अपनी शुजाअत की कहानी क्यों सुनाते है-

कि जब रावन के डर से आप लंका छोड आए है

माणसा-माणसांमधे जसा संवाद तसाच वास्तू-वास्तूंमधेसुद्धा असायचा. मन्दिर-मस्जिद आपसात हितगुज करताना आढळायचे. परस्परांची जपणूक व सांभाळ करायचे. हिफाजतसाठी वेगळया सुरक्षेची गरज नसायची.

हिफाजत के लिए मस्जिद को घेरे हो कई मंदिर
रवादारी का वो दिलकश नजारा छोड आए है

जो मन्दिर और मस्जिद गुफ्तगूँ करते थे आपसमे

हम उनको बेसबबही करके गुँगा छोड आए है

हमे तारीख भी इक खान-ए-मुजरिम मे रक्खेगी 

गले मस्जिद से मिलता इक शिवाला छोड आए है

दुआ के फुल पंडित जी जहाँ तक्सीम करते थे

गली के मोड पर हम वो शिवाला छोड आए है

असं सारं असतानासुद्धा आम्हाला कसली बुद्धी झाली? का सोडलं आम्ही वतन? कसली बेबसी?

उतार आए मुरव्वत और रवादारी का हर चोला
जो इक साधूने पहनाई थी माला छोड आए है

हम अपनी बेबसी पर अब कफे-अफसोस मलते है

कि ख्वाजा आपका भी आस्ताना छोड आए है

अभी तक याद है हाजी अली दरगाह का मंजर

समन्दर भी जहाँ ठहरा हुआ सा छोड आए है

खरोखर निर्णय घेण्यात जल्दबाजी झाली. आज अफसोस आहे. परंतु नाईलाज आहे.

अब अपनी जल्दबाजी पर बहुत अफसोस होता है
कि इक खोली की खातिर राजबाडा छोड आए है

शायर लिहितात- ‘चिडीयोंने उछलकूद बन्द करके तिलावत करना शुुरू कर दिया है। इस तिलावत मे कुरआन भी है और गुरू-बानी भी । रामायण के श्लोक भी है और गीता की शब्दावली भी । इबादत का रिश्ता मजहब से नही रूह से होता है।

मियाँ इतने बरस के बाद भी हम ये नही समझे
गुरूबानी को छोडा है कि सजदा छोड आए है

सीमारेषा कशी?तर.... सरहदी लकीर तिरछी थी जैसे बच्चे आँगन में लकडी या मिट्टी के टुकडे से खींच देते है। अब यह लकीर मुझे उस खतरनाक साँप की तरह लगने लगी जो घर की दहलीज पर आकर लम्बा-लम्बा लेट जाए, इधर के लोग उधर जाने से खौफ खा रहे हो उधर के लोग इस तरफ आते हुए। खुद ब खुद अंदाजा हो गया कि यह लकीर नही है। यह साँप है, नफरत का साँप जिसे साठ बरस पहले अंग्रेज इस रास्ते पर इंतकामन डाल गये थे ।

सियासत के बुने इक जाल मे हम फँस गये आखिर
मुहब्बत ने बनाया घर का नक्शा छोड आए है

सियासत है, रऊनत है, अदावत है, बगावत है

दबाए साथ लाए है मसिहा छोड आए है

जगाच्या पाठीवर जिथे जिथे माणसं आहेत तिथे तिथे भांडणं आहेत. दंगे-फसाद आहेत. दुनियेत झगडा दौलत, औरत आणि रोटीचाच. त्यासाठीच मग अदावत, बगावत, सियासतचे खेळ आहेत. दंगे कुठे होत नाहीत? माणसं कुठे मरत नाहीत? दंगे होतात, माणसं मरतात म्हणून का आपला मुल्क, आपलं वतन सोडून माणसं परागंदा होतात का? माणसं असं मुहाजिर जिणे स्वीकारतात का? असे प्रश्न. शायर उद्विग्न. म्हणतात-

कहा दंगे नही होते कहा इंसॉ नही मरते
तो क्यों अपनी वतन को करके रूसवा छोड आए है

असर होता है क्या माँ की दुआओ मे ये तब जाना

हम उसकी जब दुआओ का सहारा छोड आए है

इकडे येतांना प्रत्येक किमती सामान आम्ही सोबत आणलं. आमच्या पिंडाचं पोषण करणारं बरचसं ‘साहित्य’ आणायचं राहून गेलं. दीवान, गीत,गजल, तराना, दोहा,चौपाई, पदे असं बरच काही. त्याबाबत शायर राना आपले भाव व्यक्त करतात-

यहॉ आते हुए हर कीमती सामान ले आए
मगर ‘इकबाल’ का लिक्खा तराना छोड आए है

जनाबे ‘मीर’ का दीवान तो हम साथ ले आए

मगर हम ‘मीर’ के माथे का कश्का छोड आए है

जनाबे ‘दाग’ के लहजे की तुर्शी है न शीरीनी

जबाने देहलवी का हुस्न सारा छोड आए है

हमीं गालिब से नादिम है हमीं तुलसी से शर्मिन्दा

हमीं ने मीर को छोडा है मीरा छोड आए है

जमीने-नानक-ओ-चिश्ती, जबाने गालिब-ओ-तुलसी

ये सब पास था अपने ये सारा छोड आए है

जनाबे-जोश ने सच्चाई लिक्खी हो गये रूसवा

हमी अच्छे थे भारत का कसीदा छोड आए है

क्लासीकी ग़ज़ल ने जिस जगह तौकीर पाई थी

जिगर का शहर यानी शहरे-गोंडा छोड आए है

ह्या मुहाजिरनामा गजलेत बरेचदा ‘अंग्रेजी’ शब्दसुद्धा शेरांमधे चपखलपणे बसून येतात. ते अडत नाहीत. अडवत नाहीत तर दुतर्फी संदेशवहन अधिक सहज आणि सुलभ करतात. वाचनात रंगल्यानंतर असे परभाषी शब्द लक्षातसुद्धा येत नाहीत.

वाचून बघा हे काही शेर-

वो चेहरा क्या था अलबम थी मुहल्ले भरके चेहरो की
गली के मोडपर जो पानवाला छोड आए है

न ए-सी था न कूलर था मगर लू के जमाने मे

हमारा साथ देता था वो पंखा छोड आए है

वो पगडंडी जो सीधे घर से स्टेशन को जाती थी

उसी पर अपने बचपन का जमाना छोड आए है

पडोसीने जो आलू के पराठे तल के भेजे थे

हम स्टेशन की बेन्चोपर वो खाना छोड आए है

कभी लाहौरसे हम देखते थे गोल्डेन टेम्पिल

बडी मजबुरीयोंमे ये नजारा छोड आए है

हमारी बे-हिसी हैं आखिरी स्टेज पर शायद

अब आँखे भी नही रोती सिसकना छोड आए है

तर असे हे शेेर, असा हा मुहाजिरनामा. घर सोडल्यानंतरचे हाल,कष्ट, दु:ख, पश्चात्ताप आणि बेचैनी कायम उरात वागवत जगणे भाग पाडणारा.

अभी तक नींद आँखो से लडाई करती रहती है
कि हम ख्वाबों को अपने क्यों अधूरा छोड आए है

किसी भी हाल मे अपने वतन को छोड मत देना

हमारा हाल देखो घर हम अपना छोड आए है

No comments:

Post a Comment