१.
जगाशी भांडलो होतो सुखाने त्रासलो होतो
तरीही लाडका कायम जगा मी वाटलो होतो
तरीही लाडका कायम जगा मी वाटलो होतो
कुणाला काय वाटावे मला नसते तमा त्याची
रहावे ठाम त्यावर मी नको ते बोललो होतो
रहावे ठाम त्यावर मी नको ते बोललो होतो
जरी मी फारसा येथे भरोसा ठेवला नाही
तिचे मन राखण्यासाठी गुरुला भेटलो होतो
तिचे मन राखण्यासाठी गुरुला भेटलो होतो
जरी मी तोडले होते तुझ्या माझ्यातले नाते
मुलीच्या आर्त हाकेने जरा भांबावलो होतो
मुलीच्या आर्त हाकेने जरा भांबावलो होतो
मलाही द्यायचे आहे समाजाला इथे काही
जपाया शब्द मी माझे खरेतर धावलो होतो
जपाया शब्द मी माझे खरेतर धावलो होतो
२.
मावेल का कधीही शब्दात बाप सांगा
का आठवे जगाला दुःखात बाप सांगा
का आठवे जगाला दुःखात बाप सांगा
चालायला हवा ना संसार छान अपुला
असतो सदैव का या नादात बाप सांगा
असतो सदैव का या नादात बाप सांगा
दिसते जगास कायम त्याची उदास मुद्रा
असतो सदैव कुठल्या ओझ्यात बाप सांगा
असतो सदैव कुठल्या ओझ्यात बाप सांगा
जोवर समोर आहे बोलून घ्या सुखाने
बोलेल काय नंतर चित्रात बाप सांगा
बोलेल काय नंतर चित्रात बाप सांगा
बापास आस केवळ व्हावे भले मुलाचे
असतो म्हणून का या विश्वात बाप सांगा
असतो म्हणून का या विश्वात बाप सांगा
३.
जरी आला कटू अनुभव कुणाला दोष ना द्यावा
अशा किरकोळ गोष्टीचा जिवाला त्रासका व्हावा?
अशा किरकोळ गोष्टीचा जिवाला त्रासका व्हावा?
कधी आलास धाऊनी कुणाच्या सांग हाकेला
मला हे सत्य कळल्यावर कसा करणार मी धावा?
मला हे सत्य कळल्यावर कसा करणार मी धावा?
विरोधी फार होते पण कधीही थांबला नाही
इथे उपजेल का आता जसा शिवबा तसा छावा?
इथे उपजेल का आता जसा शिवबा तसा छावा?
म्हणे तू आपुला ज्याला तुला परक्यात तो बघतो
नसे किंमत जिथे थोडी कशाला जीव जाळावा?
नसे किंमत जिथे थोडी कशाला जीव जाळावा?
असे पडतात का कायम मनाला प्रश्न आयुष्या
हवेसे वाटता सारे नकोसा जीव का व्हावा?
हवेसे वाटता सारे नकोसा जीव का व्हावा?
.............................................
विवेक कुलकर्णी
No comments:
Post a Comment