१.
आश्वासने ढगांची खोटीच आस आहे
बांधून ठेवलेला मानेस फास आहे
बांधून ठेवलेला मानेस फास आहे
वैफल्य या पिढीला वांशीक भेटलेले
सामर्थ्य पावसाचे गेले लयास आहे
सामर्थ्य पावसाचे गेले लयास आहे
अंदाज आसवांचे वाचू नये कुणीही
ओठात थांबलेला माझा कयास आहे
ओठात थांबलेला माझा कयास आहे
हा कोणता तपस्वी गातो करूण गाणे
भय वाटते भयंकर आता भयास आहे
भय वाटते भयंकर आता भयास आहे
मोजून काय होते श्वासामधील अंतर
फुलस्टाप मारलेला जेथे वयास आहे
फुलस्टाप मारलेला जेथे वयास आहे
आपापल्या परीने करतो इलाज जो तो
जर का असाध्य व्याधी झाली तयास आहे
जर का असाध्य व्याधी झाली तयास आहे
२.
तिन्ही ऋतूत माझ्या डोक्यावरी उन्हाळा
अदमास काढल्यावर चुकतोय ठोकताळा
अदमास काढल्यावर चुकतोय ठोकताळा
अंदाज फेल होती दरसाल पावसाचे
खोटारडा तुझा तो पर्याप्त पावसाळा
खोटारडा तुझा तो पर्याप्त पावसाळा
शेतात राबनारी ती मानसे म्हणाली
टाका करून आता बरखास्त वेधशाळा
टाका करून आता बरखास्त वेधशाळा
आभाळ दाटल्यावर अंदाज सांगनारी
पुन्हा दिसून यावी गावात वेधशाळा
पुन्हा दिसून यावी गावात वेधशाळा
दे कोंब जीवनाचे अंकूरण्यास पाणी
द्यावा कुणीतरी मज इतकाच पावसाळा
द्यावा कुणीतरी मज इतकाच पावसाळा
.............................................
दिनेश मोडोकार
पाथर्डी
.
पाथर्डी
.
No comments:
Post a Comment