उमा पाटील : एक गझल



१.
किती रडली बिचारी ती, घराची चूल झाल्यावर
खुशीने डोलली होती, कळी जी फूल झाल्यावर

किती संतापला होता, नियत त्याची कळाल्यावर
क्षणातच तोडले नाते, जराशी भूल झाल्यावर

कळा सोसूनही पोरी, मुखावर हास्य ठेवावे
धडा स्मरला, तुझा आई, स्वतःला मूल झाल्यावर

जगाला ज्ञात झाले मग, कुणाला ज्ञात नसलेले
बदलले गावही सारे, नदीवर पूल झाल्यावर

स्वतःलाही विसरते मी, हरपते भूक - तृष्णाही
गझल लिहिण्यात नेटाने, अशी मश्गूल झाल्यावर
..............................................
उमा पाटील
धुळे
9404192537.

1 comment:

  1. स्वतःलाही विसरते मी, हरपते भूक - तृष्णाही
    गझल लिहिण्यात नेटाने, अशी मश्गूल झाल्यावर ... waah

    ReplyDelete