भागवत बनसोडे : एक गझल

Image may contain: 1 person, close-up
१.
त्या तळ्याच्या तू तळाशी एकदा जाऊन ये
कोरलेले शब्द त्याने जा पुन्हा पाहून ये

तो जिथे गेला तिथे जल पाट झाले मोकळे
धावत्या  पाण्यात थोडा धावता होऊन ये

पेटला हा प्रांत सारा शांत का बसलास तू
पेटल्या पाण्यात थोडा पेटता राहून ये

सांगतो तो ठेव येथे तू पहारा जागता
दीप हा पाण्यात त्याचा जा पुन्हा लाऊन ये

भावनांचे बंड ह्या पाण्यात आता पेटले
पेटल्या पाण्यास थोडे पेटते ठेऊन ये
.............................................................

भागवत बनसोडे 

No comments:

Post a Comment