पवन बालाराम तिकटे : एक गझल



१.
माझी व्यथा उराशी कवटाळ तूच आई
माझे कुणा म्हणू मी, सांभाळ तूच आई

माथी नशीब खोटे मी का सुखात नाही
आयुष्य व्यर्थ आता कुरवाळ तूच आई

नशिबात लाख दुःखे,सांगायची कुणाला
फोडासमान मज गे, हाताळ तूच आई

मी या जगा निनावी, शोधू कुठे विसावा
डोळ्यांत आज माझ्या, आभाळ तूच आई

अस्वस्थ देह माझा ,ती ठेच लागल्यावर
नाही मला कळाले, घायाळ तूच आई

दगडात देव जर...तर, श्वासात तूच आहे
देवास कोण वाली, मज भाळ तूच आई

माझ्या उदास देहा, ढाळू नकोस अश्रू
कित्येक सोसले हे, दुष्काळ तूच आई

............................................
पवन बालाराम तिकटे
राहेरी, बुलडाणा
7350942506

No comments:

Post a Comment