१.
का सज्जनांनी असा धरला चोरट्यांचा धाक मित्रा?
संस्कृतीचे शिलेदार मेले पहा मग हकनाक मित्रा!
संस्कृतीचे शिलेदार मेले पहा मग हकनाक मित्रा!
सोंगाचे मुखवटे झाकती अन् भरती पोटाची खळगी
त्या बहुरूप्याची येईल का आता हाक मित्रा?
त्या बहुरूप्याची येईल का आता हाक मित्रा?
सिमेंट काँक्रिटच्या गर्द जंगलात गाढ निजतो आपण
कशी कानावर येईल सांग वासुदेवाची हाक मित्रा?
कशी कानावर येईल सांग वासुदेवाची हाक मित्रा?
अरे नंदीच्या चारापाण्याला उरेना येथे कवडी दमडी
सांग पांगुळ गाड्याचे कसे फिरावे मग चाक मित्रा?
सांग पांगुळ गाड्याचे कसे फिरावे मग चाक मित्रा?
अंगावर भस्म फासून राखतो जळणारी सरणे रात्रभर
मसनजोग्याला दुधाऐवजी नैवद्याचे मिळते ताक मित्रा!
मसनजोग्याला दुधाऐवजी नैवद्याचे मिळते ताक मित्रा!
गोंधळात कधी येईल ते येवो अंबा..भवानी..
जोगत्याच्या चुलीवर व्हावा दोन वेळचा स्वयंपाक मित्रा!
जोगत्याच्या चुलीवर व्हावा दोन वेळचा स्वयंपाक मित्रा!
भोगतो कोणत्या जन्माची शिक्षा उघड्या नागड्या देहाने
भोप्याला त्या आसूडाचा वाटत नाही का धाक मित्रा?
भोप्याला त्या आसूडाचा वाटत नाही का धाक मित्रा?
दोरी अन् काठीवर पेलतो जो सारं आयुष्य येथे..
त्या डोंबार्याच्या खेळानंतर दोन पैसे टाक मित्रा!
त्या डोंबार्याच्या खेळानंतर दोन पैसे टाक मित्रा!
हा महाराष्ट्र घडला अन् सजला लोककलेतून सारा
मग हे बावनकशी सोनं का होतय रे खाक मित्रा?
मग हे बावनकशी सोनं का होतय रे खाक मित्रा?
..............................................
किरण शिवहर डोंगरदिवे,
किरण शिवहर डोंगरदिवे,
समता नगर, वॉर्ड न 7,
मेहकर, ता मेहकर जि बुलडाणा 443301 ,
मो 7588565576
No comments:
Post a Comment