विष्णु सोळंके : एक गझल


१.
नवी कविता लिहिणे जमते का ते बघतो
दु.ख उराशी धरणे जमते का ते बघतो.

असेच असते नाते माती आभाळाचे
तुझ्याच माती रुजणे जमते का ते बघतो.

स्वप्नामध्ये येते तू मलाच देते हाका
मनात तुजला बघणे जमते का ते बघतो.

कशी सुगंधी दु.खे मलाच देते छाया
तुझ्या स्मृतीशी भिजणे जमते का ते बघतो.

मला उद्याची वस्ती गडे सुखाची हवी
सुगंध तुझा जपणे जमते का ते बघतो.

.............................................
विष्णू सोळंके,९४२०७१९७७२

No comments:

Post a Comment