ओमप्रकाश ढोरे : एक गझल


१.
ना ओळखी तरी आधार वाटला
माणूस तो खरा मज दिलदार वाटला

झाले न काम माझे भेटून तारखा
प्रत्येक वार दुसरा शनिवार वाटला

पदरास सावरोनी ती भीक मागते
इतुका तिच्यात भिनला; संस्कार वाटला

बोलून टाकले मी जेव्हा मनातले
माझा मलाच हलका मग भार वाटला

गगनास भेदले अन् पाताळ छेदले
नियती पुढेच मानव लाचार वाटला

..............................................
ओमप्रकाश ढोरे
चांदूर बाजार
९४२३४२७३९०

No comments:

Post a Comment