वाटे मजला अजूनही तो सोबत आहे.
माझ्यासंगे वैशाखाला सोसत आहे!
माझ्यासंगे वैशाखाला सोसत आहे!
जरी लावते नावापुढती नाव तयाचे...
आयुष्याच्या यादीमधुनी खोडत आहे.
दिसतच नाही जरी कुठे तो, भास तरी की_
भिंतीवरच्या फोटोमधुनी बोलत आहे!
२.
पान हलवते झाड कधीही बोलत नाही.
मनात त्याच्या काही हलते सांगत नाही.
मूळ जातसे खोल; शोधते पाणी आणिक
झुरते, वळते इकडे-तिकडे थांबत नाही.
जेव्हा लागे पान गळाया निराश होते,
ओल्या जखमा माळ्यालाही दावत नाही.
ऊन-वादळे येती-जाती... त्याला कळते.
झाड दिलेली त्याची जागा सोडत नाही.
खूप शिकावे झाडाकडुनी तुम्ही-आम्ही
देते छाया, बाकी काही मागत नाही.
झाड कधीही दोष मानवा देतच नाही.
पाठ फिरवुनी जाणे आम्हा शोभत नाही.
ऋतू बदलतो, हवे असे ते मिळतच नाही.
झाड बिचारे तरीही डुलते, खंगत नाही.
तूच मानवा, जरा जपावे या झाडाला..
मुक्या जिवाला स्वतःस जपणे झेपत नाही.
मनात त्याच्या काही हलते सांगत नाही.
मूळ जातसे खोल; शोधते पाणी आणिक
झुरते, वळते इकडे-तिकडे थांबत नाही.
जेव्हा लागे पान गळाया निराश होते,
ओल्या जखमा माळ्यालाही दावत नाही.
ऊन-वादळे येती-जाती... त्याला कळते.
झाड दिलेली त्याची जागा सोडत नाही.
खूप शिकावे झाडाकडुनी तुम्ही-आम्ही
देते छाया, बाकी काही मागत नाही.
झाड कधीही दोष मानवा देतच नाही.
पाठ फिरवुनी जाणे आम्हा शोभत नाही.
ऋतू बदलतो, हवे असे ते मिळतच नाही.
झाड बिचारे तरीही डुलते, खंगत नाही.
तूच मानवा, जरा जपावे या झाडाला..
मुक्या जिवाला स्वतःस जपणे झेपत नाही.
...........................................
प्रतिभा सराफ
No comments:
Post a Comment