
१.
कोडगा दुष्काळ आला कोरडा शृंगार बाकी
लाडक्या बुजगावण्याचे हुंदके अलवार बाकी
लाडक्या बुजगावण्याचे हुंदके अलवार बाकी
जिंकला होता गुन्हा अन् घोरलेले सत्य होते 
काळजाच्या आत जागा एक साक्षीदार बाकी
काळजाच्या आत जागा एक साक्षीदार बाकी
शपथ होती पाळलेली ओठ होते गप्प  केले 
दोन डोळे बोलणारे तेवढे गद्दार बाकी
दोन डोळे बोलणारे तेवढे गद्दार बाकी
वास्तवावर शेकल्याने वेदना खरपूस झाली 
वेदनेच्या आत आहे स्वप्न हिरवेगार बाकी
वेदनेच्या आत आहे स्वप्न हिरवेगार बाकी
तू दिवा होऊन येथे उजळले आकाश सारे 
पण दिव्याच्या खालती बघ राहिला अंधार बाकी
पण दिव्याच्या खालती बघ राहिला अंधार बाकी
का अहिल्ये रोज होतो सांग ना उद्धार  ताजा ?
गौतमाला दे शिळा तू कालचा सत्कार बाकी
गौतमाला दे शिळा तू कालचा सत्कार बाकी
रंगरंगोटी-गिलावा चेहऱ्यांचा खूप झाला 
राहिलेला काळजांचा फक्त जिर्णोद्धार बाकी
राहिलेला काळजांचा फक्त जिर्णोद्धार बाकी
२.
प्राजक्ताचे फूल लाघवी टपटपलेले !
तसेच सुंदर 'मी'पण माझे ओघळलेले
तसेच सुंदर 'मी'पण माझे ओघळलेले
दिवसाने या अंथरली जी उत्कट स्वप्ने 
सवडीने मग रात्री त्यांना पांघरलेले
सवडीने मग रात्री त्यांना पांघरलेले
परंपरेच्या उंचच भिंती या भवताली 
उडण्या आतुर इच्छांचे मन गुदमरलेले
उडण्या आतुर इच्छांचे मन गुदमरलेले
कळ्या कोवळ्या कोणी खुडल्या वेळेआधी 
वृक्षाचे मन जगावेगळे तडफडलेले
वृक्षाचे मन जगावेगळे तडफडलेले
अर्थाच्याही गळ्यामधे या शब्द अडकले 
वचन तरीही केविलवाणे धडपडलेले
वचन तरीही केविलवाणे धडपडलेले
दृष्ट काढली तुझ्या मनाची मी नजरेने 
नजरेमधले मुग्ध भावही दरवळलेले
नजरेमधले मुग्ध भावही दरवळलेले
अशी मारली घट्ट मिठी तू मनास प्रेमा
मनातले मग स्पर्श बदामी गुणगुणलेले
मनातले मग स्पर्श बदामी गुणगुणलेले
देहामधुनी वावरले मी होत विदेही 
प्रश्नांमधेच उत्तर होते उलगडलेले
प्रश्नांमधेच उत्तर होते उलगडलेले
तिने जिवाला जीव वाहिला अदबीने अन् 
कृष्णहृदयही राधेकाठी विरघळलेले
कृष्णहृदयही राधेकाठी विरघळलेले
३.
ही भिंगरी मनाची मौनात स्थिर झाली
माझ्यामधील माझी यात्रा मला कळाली
माझ्यामधील माझी यात्रा मला कळाली
कोणाकडे मनाची फिर्याद नोंदवावी?
चिंता मनात शिरल्या,दंगल मनात झाली
चिंता मनात शिरल्या,दंगल मनात झाली
प्रश्नास बालकाच्या द्यावे कुठून उत्तर ?
माझेच बाळ बनतो माझ्यातला सवाली
माझेच बाळ बनतो माझ्यातला सवाली
आला तणाव जरका स्वीकारभाव ठेवू
हासून मग विचारू त्याची जरा खुशाली
हासून मग विचारू त्याची जरा खुशाली
डोळ्यांत पावसाच्या ओळी रुसून बसल्या 
मी घेतले कडेवर त्यांना हसून गाली
मी घेतले कडेवर त्यांना हसून गाली
मजबूर वेदनांचे आभार मानले मी 
त्यांनी मला घडवले मजबूत भाग्यशाली
त्यांनी मला घडवले मजबूत भाग्यशाली
गल्लीत पावसाने केला चिखल कितीही 
समजू नये कुणीही त्याला उगा मवाली
समजू नये कुणीही त्याला उगा मवाली
ओळी उनाड होत्या खोडी करून गेल्या 
"तक्रार गोड आहे"शंका मला म्हणाली
"तक्रार गोड आहे"शंका मला म्हणाली
"देशील का मला तू हृदयात सांग जागा?"
काढू तरी कसे मी अर्जास या निकाली ?
काढू तरी कसे मी अर्जास या निकाली ?
४.
तुझ्या हृदयावरी सत्ता मला देती तुझे डोळे 
कसा माझाच रे पत्ता मला देती तुझे डोळे
कसा माझाच रे पत्ता मला देती तुझे डोळे
कुण्या मेंदूमधे धोका कुण्या हेतूमधे भेसळ 
मनाची शुद्ध गुणवत्ता मला देती तुझे डोळे
मनाची शुद्ध गुणवत्ता मला देती तुझे डोळे
कुठे अन्याय झाला तर पुरेसा घाव घालाया 
'मनाचा धीट खलबत्ता' मला देती तुझे डोळे
'मनाचा धीट खलबत्ता' मला देती तुझे डोळे
उसवला जात नाही जो असा विणलास तू खोपा
तुझ्या खोप्यावरी मत्ता मला देती तुझे डोळे
तुझ्या खोप्यावरी मत्ता मला देती तुझे डोळे
अशी ओठातली भाषा कशाने रंगली माझी?
'विड्याचे पान कलकत्ता' मला देती तुझे डोळे
'विड्याचे पान कलकत्ता' मला देती तुझे डोळे
इशारा खास केला तू मिटवली पापणी डावी 
असा लाजायचा भत्ता मला देती तुझे डोळे
असा लाजायचा भत्ता मला देती तुझे डोळे
जसा इस्पिक,तसा किलवर,असे चौकट तुझ्या हाती 
बदामाचाच पण पत्ता मला देती तुझे डोळे
बदामाचाच पण पत्ता मला देती तुझे डोळे
तुझा डोळ्यावरी मक्ता तुला  विजयाकडे नेतो 
तुझ्या मक्त्यावरी सत्ता मला देती तुझे डोळे
तुझ्या मक्त्यावरी सत्ता मला देती तुझे डोळे
५.
मूक राहून पाहू 
भूक खाऊन पाहू
भूक खाऊन पाहू
जीव घेते निराशा 
जीव लावून पाहू
जीव लावून पाहू
मौन आहे गरोदर 
बोल लावून पाहू
बोल लावून पाहू
देव मरतो न जगतो 
कौल लावून पाहू
कौल लावून पाहू
गाठ पडल्यास कोठे 
गाठ सोडून पाहू
गाठ सोडून पाहू
राग येईल तेव्हा 
राग गाऊन पाहू
राग गाऊन पाहू
सावलीचे उन्हाळे 
झाड होऊन पाहू
झाड होऊन पाहू
बाद संवाद झाला 
वाद घालून पाहू
वाद घालून पाहू
तोल जाता पदांचा
चाल बदलून पाहू
चाल बदलून पाहू
पत्र स्वप्नात आले 
स्वप्न उघडून पाहू
स्वप्न उघडून पाहू
वाट पाहून झाली 
वाट लावून पाहू
वाट लावून पाहू
.............................................
विजया टाळकुटे
विजया टाळकुटे
 
 
No comments:
Post a Comment