१.
थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली
तितक्यात एक तारा पडला गळून खाली..
तितक्यात एक तारा पडला गळून खाली..
लाडात वाढलेली घेते निरोप जेव्हा
दाबून हुंदक्यांना.. निघते मला म्हणाली...
दाबून हुंदक्यांना.. निघते मला म्हणाली...
भिंती रित्या घराच्या शोधून शांत झाल्या
गेली कुठे घराची म्हणती मला खुशाली...
गेली कुठे घराची म्हणती मला खुशाली...
चिवचिव करीत आली सजला घरात खोपा
लावून ओढ मजला चिमणी कुठे उडाली...
लावून ओढ मजला चिमणी कुठे उडाली...
अंधार मावळेना सोडून सूर्य गेला
आता कुठे कुठे मी शोधू कशा मशाली...
आता कुठे कुठे मी शोधू कशा मशाली...
डोळे पुसून माझे विसरू नका म्हणाली
मुलगीच दीप होती तेव्हा मला कळाली...
मुलगीच दीप होती तेव्हा मला कळाली...
पाहून बाहुलीला आले भरून डोळे
पुसणार कोण आता माझी इथे खुशाली..
पुसणार कोण आता माझी इथे खुशाली..
२.
नशिबात होते चांदणे मी सूर्य मागत राहिलो
येथे सुखाला टाळुनी मी दु:ख वेचत राहिलो
येथे सुखाला टाळुनी मी दु:ख वेचत राहिलो
उरल्या अता घटका किती,मृत्यो तुला कवटाळण्या
प्रत्येक श्वासावर तुझे मी नाव कोरत राहिलो
प्रत्येक श्वासावर तुझे मी नाव कोरत राहिलो
भांडून जी मजला दिली,हट्टी सुखे ती कोणती?
तू हारली नव्हतीस मग,मी काय जिंकत राहिलो ?
तू हारली नव्हतीस मग,मी काय जिंकत राहिलो ?
ही माणसे ही जिंदगी,जमली न वाचाया कधी
प्रश्नात अडखळतो पुन्हा,मी काय वाचत राहिलो
प्रश्नात अडखळतो पुन्हा,मी काय वाचत राहिलो
समतोल मी राखू कसा,हसण्यातला रडण्यातला
गळतात जेव्हा पापण्या,मी बांध घालत राहिलो
गळतात जेव्हा पापण्या,मी बांध घालत राहिलो
सगळी सुखे मी शोधली पण् दु:ख मजला भावले
दु:खात सुचले शब्द जे नुसतेच मिरवत राहिलो
दु:खात सुचले शब्द जे नुसतेच मिरवत राहिलो
उधळून सारा रंगही जर राहिली बेरंग ती
नाराज त्या रंगातले मी राज शोधत राहिलो
नाराज त्या रंगातले मी राज शोधत राहिलो
३.
स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला
संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला
संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला
व्यर्थ मी देवू कशाला सावल्यांचे दाखले
जर उन्हाने पालकांसम पाळले आहे मला
जर उन्हाने पालकांसम पाळले आहे मला
आसवांचा रंग का शोधायचा असतो इथे
दु:खही रंगीत जर का लाभले आहे मला
दु:खही रंगीत जर का लाभले आहे मला
कैक प्रश्नांनी उगाचच जन्मभर छळले मला
उत्तरांना शोधण्यातच लावले आहे मला
उत्तरांना शोधण्यातच लावले आहे मला
आस मी ठेवून होतो कायद्यावर वेंधळा
शोषकांच्या त्या कुळांनी गाळले आहे मला
शोषकांच्या त्या कुळांनी गाळले आहे मला
संचिताला प्राक्तनाला दोष का मी द्यायचा
जर व्यथांनी नेहमी सांभाळले आहे मला
जर व्यथांनी नेहमी सांभाळले आहे मला
त्यागल्या आहेत साऱ्या मी सुखांच्या कल्पना
वेदनांनी नेहमी उद्धारले आहे मला
वेदनांनी नेहमी उद्धारले आहे मला
४.
देवुनी हिरवे प्रलोभन पाळले त्यांनी मला
एक खुंटी ठोकुनी मग, बांधले त्यांनी मला
एक खुंटी ठोकुनी मग, बांधले त्यांनी मला
पेटल्यावर मेणबत्ती फेकती काडी जसे
संपल्यावर काम माझे फेकले त्यांनी मला
संपल्यावर काम माझे फेकले त्यांनी मला
केवड्याचा गंध मी,त्या अत्तरांच्या मैफिली
घेतला अंदाज नंतर टाळले त्यांनी मला
घेतला अंदाज नंतर टाळले त्यांनी मला
विश्व माझे पिंजऱ्याचे सोसले आजन्म मी
पंख छाटुन मग छतावर सोडले त्यांनी मला
पंख छाटुन मग छतावर सोडले त्यांनी मला
वाळवंटी भार ज्यांचा उंट होउन वाहिला
घोट पाण्याचा मिळवण्या कापले त्यांनी मला
घोट पाण्याचा मिळवण्या कापले त्यांनी मला
.............................................
डॉ.राज रणधीर
जालना
९९२२६१४४७१
डॉ.राज रणधीर
जालना
९९२२६१४४७१
No comments:
Post a Comment