१.
नको नको ते घडू लागले
नाव तुझे आवडू लागले
नाव तुझे आवडू लागले
स्वप्ने पडली आभाळाची
मी ही मग बागडू लागले
मी ही मग बागडू लागले
अती गोड जे होते काही
नंतर नंतर कडू लागले
नंतर नंतर कडू लागले
सरळच होता रस्ता माझा
याला त्याला नडू लागले
याला त्याला नडू लागले
मनात होते दुसरे काही
दुसरे का बडबडू लागले
दुसरे का बडबडू लागले
सवय नसावी म्हणून बहुधा
हसता हसता रडू लागले
हसता हसता रडू लागले
पंखांची मज जाणिव झाली
आत कुणी फडफडू लागले
आत कुणी फडफडू लागले
धान सुखाचे गवसत नाही
दुःखाला पाखडू लागले
दुःखाला पाखडू लागले
२.
मंदिराच्या आत सुद्धा घोषणांचा त्रास झाला
देवही इतके म्हणाला हा तमाशा फार झाला
देवही इतके म्हणाला हा तमाशा फार झाला
जायचे होते खरेतर ज्या ठिकाणी गरज माझी
कोंडले येथे कशाला हा किती वनवास झाला
कोंडले येथे कशाला हा किती वनवास झाला
राम आणि रहिम येथे एक होते एक आहे
राजकारण होत गेले अन गळ्याला फास झाला
राजकारण होत गेले अन गळ्याला फास झाला
बोलले नाही कुणीही दाह होताना सितेचा
का अचानक सांग रामा आज हाहाकार झाला
का अचानक सांग रामा आज हाहाकार झाला
संत होता सभ्य होता एक व्यक्ती छान होता
देव असता जाहला पण नेमका अंधार झाला
देव असता जाहला पण नेमका अंधार झाला
पायरीवरची कदाचित हाक असती पोचली पण..
त्याच वेळी आरत्यांचा केवढा गोंगाट झाला
त्याच वेळी आरत्यांचा केवढा गोंगाट झाला
.............................................
योगिता पाटील
योगिता पाटील
No comments:
Post a Comment