१.
गाव फिरुन खाल्लेला चारा केवळ हिंदू असतो का
मंदिरातला रवंथ सारा.. केवळ हिंदू असतो का?
मंदिरातला रवंथ सारा.. केवळ हिंदू असतो का?
नेजा देतो मला मौलवी मोर पिसांनी माथ्यावर
मग कुठलाही मोर पिसारा... केवळ हिंदू असतो का?
मग कुठलाही मोर पिसारा... केवळ हिंदू असतो का?
जात्यामध्ये सारे काही भरडुन निघते फिरल्यावर
मग या देशाला दळणारा केवळ हिंदू असतो का?
मग या देशाला दळणारा केवळ हिंदू असतो का?
हल्ल्याची पाहून बातमी जखम उभ्या या देशाला
मग गळणारा अश्रू खारा केवळ हिंदू असतो का?
मग गळणारा अश्रू खारा केवळ हिंदू असतो का?
दर्ग्याच्या चादरीतला तो सुगंध घेवुन आलेला
मंदिरातला पवित्र वारा केवळ हिंदू असतो का?
मंदिरातला पवित्र वारा केवळ हिंदू असतो का?
सांग नेमकी माती कुठल्या जाती धर्माची असते?
देवाच्या मुर्तीचा गारा केवळ हिंदू असतो का?
देवाच्या मुर्तीचा गारा केवळ हिंदू असतो का?
२.
पुजारी आतही... बाहेरही
भिकारी आतही... बाहेरही
भिकारी आतही... बाहेरही
स्वतःला वाचवावे मी कसे
शिकारी आतही... बाहेरही
शिकारी आतही... बाहेरही
असे हा रोग जातीचा शिळा
बिमारी आतही... बाहेरही
बिमारी आतही... बाहेरही
भिती ना सावकारीची मला
उधारी आतही... बाहेरही
उधारी आतही... बाहेरही
इथे माणूस नागाच्यापुढे
विषारी आतही... बाहेरही
विषारी आतही... बाहेरही
छुप्या युद्धास फुटले तोंड पण
तुतारी आतही... बाहेरही
तुतारी आतही... बाहेरही
३.
दिले तिच्या जख्खड हातांनी
मऊ प्रेम खरबड हातांनी
मऊ प्रेम खरबड हातांनी
नकोस घालू लोटांगण तू
किमान पाया पड हातांनी
किमान पाया पड हातांनी
स्टेज, ढोलकी,बोट,नर्तकी
मी गाजवला फड हातांनी
मी गाजवला फड हातांनी
खत पाणी तू घालत गेला
छाटलास मग घड हातांनी
छाटलास मग घड हातांनी
जितके होते देण्यासाठी
उधळलेस अवघड हातांनी
उधळलेस अवघड हातांनी
ओठांनीही करता येते
करू बंद बडबड हातांनी
करू बंद बडबड हातांनी
बोट हलवले फक्त शेवटी
थकलेल्या अवजड हातांनी
थकलेल्या अवजड हातांनी
तिरडीवरचा बाप विव्हळतो
मुले उचलतिल जड हातांनी
मुले उचलतिल जड हातांनी
४.
दूर माणसे करते सडकी
फार चांगली असते कडकी
फार चांगली असते कडकी
हवी तेवढी लाव आग तू
शीतल तितकी बनते मडकी
एक दिवस ठरलेला असतो
असे इमारत म्हणते पडकी
असे इमारत म्हणते पडकी
विझण्याआधी दिवा फडफडे
तुला एकदा भरेल धडकी
तुला एकदा भरेल धडकी
फुर्सतमध्ये बनली दुनिया
मीच एकटा तडकाफडकी
मीच एकटा तडकाफडकी
अपुली एक्झिट असेल हसरी
असो भलेही एंट्री रडकी
असो भलेही एंट्री रडकी
५.
जन्मतो फार घाईत माझा
राग इतका सराईत माझा
राग इतका सराईत माझा
देह माझा दिला मी जुईला
प्राण अडकून जाईत माझा
प्राण अडकून जाईत माझा
कोण गेला म्हणे बाप माझा
बाप जगतोय आईत माझा
बाप जगतोय आईत माझा
पीक शब्दात बहरून आले
ओतला घाम शाईत माझा
ओतला घाम शाईत माझा
वेळ देतो कुठे मी स्वतःला
जन्म वाटे तिऱ्हाईत माझा
जन्म वाटे तिऱ्हाईत माझा
घातला त्यास गंडा असा की
घालतो देव ताईत माझा
घालतो देव ताईत माझा
शौक ठसणीत म्हटला मला हे
ठेव वाटा कमाईत माझा
ठेव वाटा कमाईत माझा
..............................................
अमित वाघ
अमितजी छान झाल्याहेत गझला. हे शेर विशेष आवडले
ReplyDeleteपुजारी आतही... बाहेरही
भिकारी आतही... बाहेरही
स्वतःला वाचवावे मी कसे
शिकारी आतही... बाहेरही
पीक शब्दात बहरून आले
ओतला घाम शाईत माझा
वेळ देतो कुठे मी स्वतःला
जन्म वाटे तिऱ्हाईत माझा