१.
जीवनावरचा पहारा वाढतो
त्यात मृत्युचा दरारा वाढतो
त्यात मृत्युचा दरारा वाढतो
धावतांना धाप लागे खूप पण
थांबल्यावर कोंडमारा वाढतो
थांबल्यावर कोंडमारा वाढतो
झाकले मागे ढगाच्या तोंड तू
पावसा...ये, शेतसारा वाढतो
पावसा...ये, शेतसारा वाढतो
स्पर्शूनी जाता मनाला सय तुझी
आठवांचा मग पसारा वाढतो
आठवांचा मग पसारा वाढतो
लाखमोलाचा जरी ऐवज तुझा
वेळ गेल्यावर घसारा वाढतो
वेळ गेल्यावर घसारा वाढतो
तू नको स्वप्नात येऊ सारखा
गोठत्या थंडीत पारा वाढतो
गोठत्या थंडीत पारा वाढतो
२.
सौदामिनी नभीची साकार होत आहे
हर एक श्वास माझा एल्गार होत आहे
हर एक श्वास माझा एल्गार होत आहे
सटवीस मीच देते लिहिण्या नवीन उर्जा
वाढीव त्रास माझा अधिकार होत आहे
वाढीव त्रास माझा अधिकार होत आहे
लांघून उंबऱ्याला ती अंतराळ फिरली
मुलगी तरी जगाला का भार होत आहे
मुलगी तरी जगाला का भार होत आहे
भाऊ हवा कशाला संरक्षणास माझ्या
माझाच मी स्वतःला आधार होत आहे
माझाच मी स्वतःला आधार होत आहे
स्पर्शू नका तिला रे होईल राख तुमची
आता अशी विजेची ती तार होत आहे
आता अशी विजेची ती तार होत आहे
घाई तुला कशाची आहे यमा अघोरी
रे थांब ना जरासा मी स्वार होत आहे
रे थांब ना जरासा मी स्वार होत आहे
.............................................
कीर्ती संजय इंगोले,
समृद्धी अपार्टमेंट,
हडपसर पुणे - 411028
9422006871ingolekirti@gmail.com
समृद्धी अपार्टमेंट,
हडपसर पुणे - 411028
9422006871ingolekirti@gmail.com
अप्रतिम गझला दोन्हीही. बहोत खूब
ReplyDeleteमुलगी....🌹🌹👌🏻👌🏻👌🏻खूप सुंदर ताई!
ReplyDeleteछान गझला किर्तीजी! हे शेर विशेष आवडले -
ReplyDeleteजीवनावरचा पहारा वाढतो
त्यात मृत्युचा दरारा वाढतो
धावतांना धाप लागे खूप पण
थांबल्यावर कोंडमारा वाढतो
झाकले मागे ढगाच्या तोंड तू
पावसा...ये, शेतसारा वाढतो
तू नको स्वप्नात येऊ सारखा
गोठत्या थंडीत पारा वाढतो