१.
कृष्ण प्याल्यामुळे वेगळी वाटते
राधिके तू मला सावळी वाटते
दे शिव्या शाप तू बोल काही तरी
मौन मजला तुझे वादळी वाटते
कोण चोखा, तुका; कोण ज्ञाना,
जना विठ्ठला ही तुझी मंडळी वाटते
जना विठ्ठला ही तुझी मंडळी वाटते
वादळांना तुझी केवढी धासती
ती नभाची मला पोकळी वाटते
ती नभाची मला पोकळी वाटते
हा गुलाबी तुझा चेहरा छानसा
ओठ नाजूकशी पाकळी वाटते
ओठ नाजूकशी पाकळी वाटते
कोठुनी दु:ख येते कळेना कसे
ही निराशा मला काजळी वाटते
बरमुडा ट्रँगला सारखी ही तुझी
हाय गालातली मज खळी वाटते
हाय गालातली मज खळी वाटते
२.
तू दिसता आनंद एवढा अपार होतो
मनामध्ये हा कुठून इतका थरार होतो
देहांमध्ये थोडीशीही फट सापडता
श्वासाचाही पक्षी नकळत पसार होतो
रूपांतरण ही किमया आहे निसर्गातली
शिशीर सरता सरता वसंतबहार होतो
शिशीर सरता सरता वसंतबहार होतो
हळूहळू गोडवा वाढतो संबंधांचा
त्या आधी नात्याचा छोटा करार होतो
स्पर्शाचे कौशल्य तुझे अलवार असे की
बघता बघता देहच अवघा सतार होतो
३.
वर्ज्य स्वरांना घेउन गाणी म्हणता यावी
दगडाच्या टाळांची टाळी करता यावी
दगडाच्या टाळांची टाळी करता यावी
तेलाचे तर दिवे कुणीही पेटवु शकतो
पाण्याची मज पणतीही पेटवता यावी
संपत्तीला सुद्धा दैवी सुगंध येइल
आपत्तीला इष्टापत्ती करता यावी
खोदत जावे खोल खोल सापडतिल नक्की-
झरे लागतील तोवर माती खणता यावी
झरे लागतील तोवर माती खणता यावी
नसुदे कापुस तुझ्या दिव्याला जळण्यासाठी
चिंधीचीही वात छानशी वळता यावी
चिंधीचीही वात छानशी वळता यावी
तवा छानशी भाजुन देइल पोळी तुजला
त्याआधी, पण कणीक तुजला मळता यावी
त्याआधी, पण कणीक तुजला मळता यावी
संकटात जर कुणीच नसले सोबत, तेव्हा-
तुझी लढाई तुलाच केवळ लढता यावी
तुझी लढाई तुलाच केवळ लढता यावी
प्रारब्धाला पदरामध्ये दगड बांधु दे
त्या दगडाची सुंदर मुर्ती घडता यावी
लक्षुमनाचे येणे नक्की असते तरिपण
उर्मिलेसम वाट प्रियकरा बघता यावी
उर्मिलेसम वाट प्रियकरा बघता यावी
४.
आग्रहाची मूठ झाली सैल आता
या थडीला भेटले मज पैल आता
या थडीला भेटले मज पैल आता
आत्महत्या का बरे करतोस बापा
मालकाला बोलला मग बैल आता
ही गुरे ही वासरे आकाश पाहुन
आवडाया लागले मज ऐल आता
रंगतो रंगात पण मळतो कुठे मी
चित्त माझे होत आहे तैल आता
चालण्याचा फक्त मी आनंद घेतो
मी जराही मोजतो ना मैल आता
मी जराही मोजतो ना मैल आता
५.
हृदयातुन काही सलते
मग डोळ्यातुन पाझरते
मग डोळ्यातुन पाझरते
ती जळते वात म्हणूनी
या काळोखाला दिसते
या काळोखाला दिसते
चालकाविना सुद्धाही
काळाची गाडी पळते
काळाची गाडी पळते
या झाडाचे संतूलन
मातीच्या नभात असते
मातीच्या नभात असते
संपून ग्रंथ जातो, पण-
ही गाथा कोठे सरते ?
ही गाथा कोठे सरते ?
या श्वासांच्या गिरणीतुन
हे कोण कुणाला दळते ?
हे कोण कुणाला दळते ?
अहसास पुरेसा असतो;
मग,आतुन काही हलते
मग,आतुन काही हलते
मी आतुन फाटत जातो
ती बाहेरुन गलबलते
.............................................
कमलाकर आत्माराम देसले
ती बाहेरुन गलबलते
.............................................
कमलाकर आत्माराम देसले
कमलाकरजी, छान झाल्या आहेत गझला. हे शेर विशेष आवडले.
ReplyDeleteकृष्ण प्याल्यामुळे वेगळी वाटते
राधिके तू मला सावळी वाटते
दे शिव्या शाप तू बोल काही तरी
मौन मजला तुझे वादळी वाटते
कोण चोखा, तुका; कोण ज्ञाना, जना
विठ्ठला ही तुझी मंडळी वाटते
स्पर्शाचे कौशल्य तुझे अलवार असे की
बघता बघता देहच अवघा सतार होतो
खोदत जावे खोल खोल सापडतिल नक्की-
झरे लागतील तोवर माती खणता यावी
चालण्याचा फक्त मी आनंद घेतो
मी जराही मोजतो ना मैल आता