१.
वेदनेचे रान झाले
गीत त्याचे छान झाले
गीत त्याचे छान झाले
उमगले मज स्वप्न माझे
वास्तवाचे भान झाले
वास्तवाचे भान झाले
शुष्क होता झाड माझे
कोवळे मी पान झाले
कोवळे मी पान झाले
गात गेले दुःख माझे
संयमाचे गान झाले
संयमाचे गान झाले
मी जरासे लीन होता
ईश्वराचे ज्ञान झाले
ईश्वराचे ज्ञान झाले
चालले मी चाल माझी
सोहळ्याची शान झाले
सोहळ्याची शान झाले
२.
वेदना का वाहतो बेकार मित्रा
मुखवट्यांचा हा नको आधार मित्रा
मुखवट्यांचा हा नको आधार मित्रा
दुःख केव्हा राहते शाबूत येथे
सूर्य ना घेतो कधी माघार मित्रा
सूर्य ना घेतो कधी माघार मित्रा
का रहावे तू विसंबूनी कुणावर
आज भाग्याचाच तू सरदार मित्रा
आज भाग्याचाच तू सरदार मित्रा
काजव्यांनी ही सजावी रात येथे
अन प्रकाशावा जरा अंधार मित्रा
अन प्रकाशावा जरा अंधार मित्रा
थोपटावी पाठ शत्रूनेच तेव्हा
एवढा आहेस तू दिलदार मित्रा
एवढा आहेस तू दिलदार मित्रा
.............................................
सौ.समृद्धी संजय सुर्वे
चिंचवड, पुणे ३३
७४२०८२८१८४
सौ.समृद्धी संजय सुर्वे
चिंचवड, पुणे ३३
७४२०८२८१८४
No comments:
Post a Comment