शब्दांनाही यावी गोडी, सर्वांसाठी साखर व्हावे.
पोटासाठी फिरतो त्याच्या घासांसाठी भाकर व्हावे.
पोटासाठी फिरतो त्याच्या घासांसाठी भाकर व्हावे.
रस्त्यांवरती कुजते ज्यांचे सुमनागत ते निर्मळ जीवन.
व्याकुळलेल्या बाळांसाठी जग मायेचा सागर व्हावे.
व्याकुळलेल्या बाळांसाठी जग मायेचा सागर व्हावे.
अज्ञानावर करण्या मारा विज्ञानाची सोबत घ्यावी.
एकोप्याने लढता लढता ज्ञानाचा मग जागर व्हावे.
एकोप्याने लढता लढता ज्ञानाचा मग जागर व्हावे.
गावोगावी बाबांचे अन, चेल्यांचेही आले वारे.
ढोंग्यांसोबत फिरण्यापेक्षा, विद्वानांचे चाकर व्हावे.
ढोंग्यांसोबत फिरण्यापेक्षा, विद्वानांचे चाकर व्हावे.
शत्रूलाही द्यावी माफी अन् मित्राला हृदयी ठेवा.
मित्रासोबत शत्रूलाही संकटकाळी सादर व्हावे.
मित्रासोबत शत्रूलाही संकटकाळी सादर व्हावे.
२.
किती मी टाळतो मृत्यू तुला भेटायचे येथे
तरी तू सोडले नाही मला खेटायचे येथे
तरी तू सोडले नाही मला खेटायचे येथे
जगाला सांगती नेते म्हणे सरतील हेही दिन
तुम्ही सांगा असत्याला किती रेटायचे येथे ?
तुम्ही सांगा असत्याला किती रेटायचे येथे ?
नको गाड्या नको माड्या नको ते शाप दुबळ्यांचे
नभाच्या चांदण्याखाली सुखे लेटायचे येथे
नभाच्या चांदण्याखाली सुखे लेटायचे येथे
कमी झाली किती झाडे धरा ही बोडकी झाली
उद्या दंगेच पाण्याचे बघा पेटायचे येथे
उद्या दंगेच पाण्याचे बघा पेटायचे येथे
कुणाला जात ती नडते कुणाला धर्मही छळतो
कश्याला व्यर्थ गोष्टींना उगा फेटायचे येथे
कश्याला व्यर्थ गोष्टींना उगा फेटायचे येथे
३.
व्यवहार तो जगाचा वृध्दाश्रमी फिरवतो.
आईस फक्त नाही बापासही रडवतो.
आईस फक्त नाही बापासही रडवतो.
हसतो किती सदा रे गर्दीत माणसांच्या.
वाटे मला असे की दु:खास तू दडवतो.
वाटे मला असे की दु:खास तू दडवतो.
दिसता सुहास्य ललना घेतो कवेत तिजला.
स्वप्नातला मनाचा घोडा किती पळवतो.
स्वप्नातला मनाचा घोडा किती पळवतो.
करतात रोज चोऱ्या भरतात ते तिजोऱ्या.
जाणे न त्या दिशेला कां वाट ती मळवतो.
जाणे न त्या दिशेला कां वाट ती मळवतो.
होतो गुरू अजुनही स्वार्थात अंध-लोभी.
मागून अंगठा मग चेल्यास तो अडवतो.
मागून अंगठा मग चेल्यास तो अडवतो.
चुकशी जरी कितीही सोडू नको प्रयत्ना.
घेतो खरी परीक्षा अनुभव सदा घडवतो.
घेतो खरी परीक्षा अनुभव सदा घडवतो.
संशय मनात येता भिंती उभ्या रहाती.
भावासवे प्रसंगी भावास तो लढवतो.
भावासवे प्रसंगी भावास तो लढवतो.
४.
मित्र लाखो तरी एकटे वाटते
मन कुणी चोरल्यासारखे वाटते
मन कुणी चोरल्यासारखे वाटते
पाहते ती अशी मान वेडावुनी
ते स्वतःशी तिचे लाजणे वाटते
ते स्वतःशी तिचे लाजणे वाटते
ती सदा बोलते हातचे राखुनी
ते मला मग तिचे टाळणे वाटते
ते मला मग तिचे टाळणे वाटते
शब्द मनीचे किती तू सहज बोलते
मज अता साजणी मोकळे वाटते
मज अता साजणी मोकळे वाटते
भौतिकाचा किती सोस हा मानवा
या जगी ते वृथा धावणे वाटते
या जगी ते वृथा धावणे वाटते
गाय ती चाटते वासराच्या मुखा
रूप ते गोजिरे साजिरे वाटते
रूप ते गोजिरे साजिरे वाटते
राजवाडा कसा मी म्हणू या घरा
माय-बापाविना पोरके वाटते
माय-बापाविना पोरके वाटते
५.
नश्वरावर का उगा तू भाळला ?
देह सारा वेदनांनी ग्रासला
देह सारा वेदनांनी ग्रासला
जात धर्मांच्या किती ह्या दंगली ?
देश सारा यामुळे मागासला
देश सारा यामुळे मागासला
खूप सारी पुस्तके मी वाचली
माणसाचा चेहरा मग वाचला
माणसाचा चेहरा मग वाचला
सागरासी थेट नाते जोडले
एक अश्रू फक्त त्याने ढाळला
एक अश्रू फक्त त्याने ढाळला
मी स्वतःला शिष्य समजू लागलो
मग कुठे त्यांनी गुरू मज मानला
मग कुठे त्यांनी गुरू मज मानला
.............................................
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३).
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३).
No comments:
Post a Comment