१.
नको तेवढे तुटले नाते जुळल्या नंतर
कसे जुळावे पुन्हा नव्याने तुटल्या नंतर
कसे जुळावे पुन्हा नव्याने तुटल्या नंतर
रांग मिरवते नावा मागे ती पदव्यांची
सुजाण नाही झाली पण ती शिकल्या नंतर
सुजाण नाही झाली पण ती शिकल्या नंतर
इथे तिथे मी धावत गेले सौख्य शोधण्या
घरात आई जवळ मिळाले थकल्या नंतर
घरात आई जवळ मिळाले थकल्या नंतर
झळा उन्हाच्या सोसल्या तिने शैशवातही
कळी गुलाबी कशी खुलावी सुकल्या नंतर
कळी गुलाबी कशी खुलावी सुकल्या नंतर
पर्वा करतो का मैत्रीची कृतघ्न सागर
किना-यासही तो झोडपतो चिडल्या नंतर
किना-यासही तो झोडपतो चिडल्या नंतर
२.
उडून गेली दूर विदेशी पिल्ले सारी
वाट पाहुनी थकल्या घरटी जर्जर घारी
वाट पाहुनी थकल्या घरटी जर्जर घारी
निघावयाला दुःख थांबले होते दारी
रुसली होती पण सौख्याची शाही स्वारी
रुसली होती पण सौख्याची शाही स्वारी
थकले शरीर उत्सुक होते प्राण सोडण्या
श्वासांची पण फिटली नव्हती पूर्ण उधारी
श्वासांची पण फिटली नव्हती पूर्ण उधारी
भिती वाटते अश्रूंना जळत्या सूर्याची
पाऊस किंवा रात्र हवी त्यांना अंधारी
पाऊस किंवा रात्र हवी त्यांना अंधारी
विश्वासाला साथ लागते विश्वासाची
संशयास पण जोडी त्यांची खुपते भारी
संशयास पण जोडी त्यांची खुपते भारी
.............................................
डाॅ अमिता गोसावी
डाॅ अमिता गोसावी
No comments:
Post a Comment