प्रमोद वाळके : एक गझल

Image may contain: Pramod Walke, glasses

१.
जे जे विषम ते टाळतो  सज्जन असे का बोलले
माणूसपण सांभाळतो सज्जन असे का बोलले

मी संविधानाची गती, मी तर्जनीपुढची दिशा
मी लोकशाही पाळतो सज्जन असे का बोलले

तो तर सियासत अग्रणी  तो मूल्यवंचित मोहरा
तांड्यातची घोटाळतो  सज्जन असे का बोलले

मी सार्वभौमिक लेखणी  मी भारताची संहिता
मी वंचिता कवटाळतो  सज्जन असे का बोलले

आम्ही नभाचे सारथी  ऐकून ही दांभिकता
हा सूर्यही ओशाळतो सज्जन असे का बोलले

सौहार्द इथले जाळण्या  उजवा दिखावा दरदिनी
म्हातारपण तेजाळतो  सज्जन असे का बोलले

निष्क्रांत वादळ तो भला  त्याच्यापरी त्याचे जिणे
मजला युगंधर भाळतो  सज्जन असे का बोलले
..............................................
प्रमोद वाळके ' युगंधर ',
प्लाट क्रमांक ४०,
परफेक्ट सोसायटी,
पन्नासे लेआऊट क्रमांक ५,
नागपूर - ४४० ०२२.
मोबाईल.  ८३२९३७४९९६.

No comments:

Post a Comment