अलका देशमुख : एक गझल



१.
क्षण ते जिवास माझ्या उसवून जात होते
मी बोलुनी जगाला हसवून जात होते...

टाकून बोलणारे होते बरेच काही
ओळीं त त्या मला ही बसवून जात होते

नाही कधीच केला त्रागा उगा जिवाचा..
माझ्या मनी सुखाला वसवून जात होते

गेल्या कितीच वेळा सरकुन सावल्या त्या
जाणीव ही मनाशी ठसवून जात होते

ते ओंजळीत मोती झाकून घेतले मी
जग हे तरी मला का फसवून जात होते

...........................................................
अलका देशमुख

No comments:

Post a Comment