१.
मला माझ्यामधे मी वेगळा दिसतो
जणू वेडा कुणी नैराश्य जो जपतो
जणू वेडा कुणी नैराश्य जो जपतो
कुणी येणार आहे का अता येथे ?
कशाला सारखा मागे वळुन बघतो ?
कशाला सारखा मागे वळुन बघतो ?
पिऊ सिगरेटही मग..… शांततेने चल
तुझ्यावर आज थोडा खर्च मी करतो
तुझ्यावर आज थोडा खर्च मी करतो
कुणी उघडत कसे नाही कळत नाही
कधीपासून मी हे दार वाजवतो
कधीपासून मी हे दार वाजवतो
मला माहीत आहे चूक आहे ही
तरी देखील बघ मुद्दाम मी चुकतो
तरी देखील बघ मुद्दाम मी चुकतो
कसे आयुष्य गेले ? प्रश्न पडल्यावर
भिकारी त्या रित्या ताटाकडे बघतो
भिकारी त्या रित्या ताटाकडे बघतो
२.
राहतो माझ्यामधे भलता कुणी
हसत असतो सारखा हसरा कुणी
हसत असतो सारखा हसरा कुणी
का तुला हे जग नकोसे वाटले .
नेमका तुजला दिला धोका कुणी
नेमका तुजला दिला धोका कुणी
छान खुप वाटायचे ज्याच्यासवे
आपल्यासोबत असा होता कुणी ?
आपल्यासोबत असा होता कुणी ?
एकटे खुप वाटते आहे मला
या घरी आता मला भेटा कुणी
या घरी आता मला भेटा कुणी
का बघत आहेस तू मागे वळुन
करत आहे का तुझा पिच्छा कुणी ?
करत आहे का तुझा पिच्छा कुणी ?
का म्हणुन दुनियेत या मी राहतो
रोल माझा कोणता सांगा कुणी
रोल माझा कोणता सांगा कुणी
.............................................
पुरुषोत्तम चंद्रात्रे
No comments:
Post a Comment