असावे सोबतीला छानसे काही 
मनाचा मोर नाचावा असे काही
मनाचा मोर नाचावा असे काही
किती मी यत्न केला बेरजेसाठी
वजा झालीच अंती माणसे काही
वजा झालीच अंती माणसे काही
जशी आहे तशी तुज दावली त्याने 
असो ,असतात खोटे आरसे काही
असो ,असतात खोटे आरसे काही
म्हणे तू फार मोठे लोक आहे ते 
इथे तर दिसत नाही रे तसे काही
इथे तर दिसत नाही रे तसे काही
मला नाकारले हे तू बरे केले 
तसे माझ्यात नाही फारसे काही
तसे माझ्यात नाही फारसे काही
२.
प्रवीण आहेस फार तू पण 
उशीर केलास यार तू पण
उशीर केलास यार तू पण
जरा तरी भाव खायचा रे 
लगेच झाला तयार तू पण
अशात अपुले तुटेल नाते
हुशार मी पण हुशार तू पण
लगेच झाला तयार तू पण
अशात अपुले तुटेल नाते
हुशार मी पण हुशार तू पण
समाज म्हणतो खुळाच आहे 
छुपा निघालास यार तू पण
छुपा निघालास यार तू पण
मला भलेही नकार तू पण 
जरा स्वतःला विचार तू पण
जरा स्वतःला विचार तू पण
३.
आवडीने बुडला असावा 
डोह त्याला रुचला असावा
डोह त्याला रुचला असावा
सर्व कोठे शाळेत मिळते ?
परिस्थितीने घडला असावा
परिस्थितीने घडला असावा
संपल्यावरती न्याय झाला 
कायदयाने लढला असावा
कायदयाने लढला असावा
राखले ना सातत्य त्याने 
कौतुकाला भुलला असावा
कौतुकाला भुलला असावा
का बरे तो वधला असावा ?
जे खरे ते वदला असावा
जे खरे ते वदला असावा
४.
सदा स्थीर नसतेच आयुष्य बाळा 
हिवाळा उन्हाळा कधी पावसाळा
हिवाळा उन्हाळा कधी पावसाळा
हयातीत माझ्या चिखलफेक केली 
चितेवर कशाला अता फूल माळा
चितेवर कशाला अता फूल माळा
तुझे स्नान होते दह्याने दुधाने 
तरी का विठोबा तुझा रंग काळा
तरी का विठोबा तुझा रंग काळा
झिजायास माझा इथे जन्म झाला 
जिथे भेटलो मी तिथे मज उगाळा
जिथे भेटलो मी तिथे मज उगाळा
ऋतू आपलाही कुठे एक आहे 
तुझा वेगळा आणि माझा निराळा
तुझा वेगळा आणि माझा निराळा
तिची भेट आता नको वाटते मज 
जुन्या आठवांना कशाला उजाळा
जुन्या आठवांना कशाला उजाळा
.............................................
रामकृष्ण रोगे
रामकृष्ण रोगे
 

 
No comments:
Post a Comment