माझ्या पुढे उभे हे,सारे पहाड होते
अन् दुःख यातनांचे, पाठी बि-हाड होते
अन् दुःख यातनांचे, पाठी बि-हाड होते
फांद्या किती मनाच्या ,वठल्या तूटून गेल्या
हे माळरान माझे,झाले उजाड होते
हे माळरान माझे,झाले उजाड होते
दारावरुन जग हे ,आले निघून गेले
होते जरी मनाचे,उघडे कवाड होते
होते जरी मनाचे,उघडे कवाड होते
हासून लोटले मी,मागे पुन्हा तळाशी
जे साचले कधीचे,डोळ्यापल्याड होते
जे साचले कधीचे,डोळ्यापल्याड होते
हसलो कधी उगा मी,रडलो कधी उगा मी
हे दुःखही मनाचे,भलते उनाड होते
हे दुःखही मनाचे,भलते उनाड होते
सांभाळुनी जगाला घेतो ब-याचदा मी
पण लेखणी अखेरी ,माझी कु-हाड होते
पण लेखणी अखेरी ,माझी कु-हाड होते
२.
माझ्यासवे युगांचा,करती प्रवास स्वप्ने
मी टाकता पथारी,निजती उशास स्वप्ने
मी टाकता पथारी,निजती उशास स्वप्ने
मी लावतो समाधी,संपन्न आशयांची
समृध्द काफियांची,पडती मनास स्वप्ने
समृध्द काफियांची,पडती मनास स्वप्ने
हातावरी प्रियेच्या,सजली नखांत मेंदी
माझ्या परीच झाली,मग देवदास स्वप्ने
माझ्या परीच झाली,मग देवदास स्वप्ने
करतो सखोल चर्चा,पुतळ्यासवे व्यथांची
ऐकून सांजवेळी,होती उदास स्वप्ने
ऐकून सांजवेळी,होती उदास स्वप्ने
हृदयी खुशाल माझी,चाले कलंदरी अन्
विजनी मनाप्रमाणे,उडती झकास स्वप्ने
विजनी मनाप्रमाणे,उडती झकास स्वप्ने
अज्ञात काफिल्याचा,अज्ञात जोगिया मी
माझ्या रितेपणाची,करती मिजास स्वप्ने
माझ्या रितेपणाची,करती मिजास स्वप्ने
भरली चिलीम जेंव्हा,निर्मोह जाणिवाची
पडतील शाश्वताची,आता कुणास स्वप्ने?
पडतील शाश्वताची,आता कुणास स्वप्ने?
घेवून लोक आले,घाटात लाकडांना
बिलगून राहिली मग,माझ्या शवास स्वप्ने
बिलगून राहिली मग,माझ्या शवास स्वप्ने
.............................................
प्रा.संजयकुमार बामणीकर
नांदेड
मो.९५७९६६४८९७
प्रा.संजयकुमार बामणीकर
नांदेड
मो.९५७९६६४८९७
संजयजी, बहोत बढीया.. !
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
ReplyDeleteउत्तम झाल्यात गझला.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
ReplyDeleteउत्तम झाल्यात गझला .
खूपच छ्यान गझलकार बामनीकर💐💐
ReplyDeleteJabbrdast sirji
ReplyDeleteGreat job work 👌😊
ReplyDelete